श्री संत भायजी महाराजाची आरती

जयजय गुरुवर्या महाराया । सद्गुरु भायजीराया । जयजय गुरुवर्या महाराया ।। धृ ।।

तर्‍हाळे ग्रामी । अवतरला । जन हा तारायाला । ब्राह्मणवंशात जन्मला । भाग्यरवी उदयाला ।
उदयाचळी आला । सकलांला । लीला दावायाला। रावण उत्सव तो सुरु केला । भरवियले यात्रेला । संगमस्थानाला। नवमीला । रामजन्म तो केला । केले धाकलीला । यात्रेला । बहुत अन्नदानाला ।
चारा चारियला । गाईला आनंदोत्सव केला । विश्वोद्धाराच्या सत्कार्या । येई भायजीराया ।। १ ।। जयजय ।।

सद्गुरु केलासे । गोविंद । एक लागला छंद । तुटले तटतटा । भवबंध । कोंदियला आनंद ।
पसरे कीर्तीचा सुगंध। ब्रह्मानंदमरंद । भायजी गुरु सेवी । स्वच्छंद । होउनि या मकरंद ।
जवळी केला तो मुकुंद। रविकुलसरोऽरविंद । मायानदिमधुनी । मतिमंद । तारियला जनवृंद । भायजी गमलासे । जगवंद्य । आनंदाचा कंद । रघुपति तव पाया। बा सदया । लागे ये ताराया ।। २ ।।
जयजय ।।

रचयिता : नारायण लक्ष्मण हेटे (रघुपती)

रघुपती ऊर्फ नारायणराव हेटे